Success Story

स्वच्छ भारत अभियान

‘स्वच्छता मतदान’ उपक्रमा द्वारे स्वच्छताविषयक शिक्षण

Swachh Matadan 1
Swachh Matadan 2
Swachh Matadan 3
Swachh Matadan 4
Swipe

उपक्रम

  • नागपूर जिल्ह्यातील १,५६२ शाळांतील सुमारे ८० हजार विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसाठी मतदान केले
  • मुलांमध्ये स्वच्छतेचा संदेश तर पोहोचलाच शिवाय लोकशाहीतील महत्त्वपूर्ण अशा मतदानाच्या प्रक्रियेचा अनुभव
  • ८० हजार बालमतदारांनी स्वच्छतेसाठी नोंदविलेले मत भविष्यातील स्वच्छ सुंदर भारताची नांदी ठरले आहे

स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला ‘स्वच्छता हीच सेवा’ हा मंत्र नागपूर जिल्हा प्रशासनाने अंगिकारला आहे. २०१६-१७ मध्ये जिल्हा हागणदारी मुक्त झाल्यानंतरही स्वच्छता अभियानातील सातत्य टिकविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. असाच एक उपक्रम म्हणजे जिल्ह्यातील शाळांमधून झालेले ‘स्वच्छता मतदान’. जिल्ह्यातील १,५६२ शाळांतील सुमारे ८० हजार विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसाठी मतदान केले.

स्वच्छतेचा थेट संबंध आरोग्याशी असून समाजात आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारल्या जाणे महत्त्वाचे आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व आरोग्याच्या चांगल्या सवयी रुजाव्यात, स्वच्छतेविषयी त्यांची समज वाढावी यासाठी ‘स्वच्छता मतदान’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे मुलांमध्ये स्वच्छतेचा संदेश तर पोहोचलाच शिवाय लोकशाहीतील महत्त्वपूर्ण अशा मतदानाच्या प्रक्रियेचा अनुभवही विद्यार्थ्यांना मिळाला. या बालमतदारांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचविण्यातही प्रशासनाला यश मिळाले आहे.

मतदानासाठी विद्यार्थ्यांनी सकाळपासून रांगा लावल्या. पहिल्यांदाच मतदान करीत असल्याचा उत्साह व उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यांवर दिसत होती. मत देण्यापूर्वी बोटावर शाई लावली जात होती. विद्यार्थ्यांना याचे फार अप्रुप वाटत होते. विद्यार्थी एकमेकांना ही खुण खूप उत्साहाने दाखवित होते. चित्ररूपी व रंगीत मतपत्रिका मुलांना न आवडत्या तरच नवल! मतदान करण्याच्या प्रक्रीयेमध्येच विद्यार्थ्यांचे स्वच्छताविषयक शिक्षण होत होते.

एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा स्वच्छता विषयक जाणीवजागृती मधील सहभाग अभूतपूर्व असाच म्हणावा लागेल. जिल्ह्यात एकाच वेळी ८० हजार बालमतदारांनी स्वच्छतेसाठी नोंदविलेले मत भविष्यातील स्वच्छ सुंदर भारताची नांदी ठरले आहे.